Supreme Court: युवकांना समजावून सांगा, आक्रमक भूमिका टाळा; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

Supreme Court Advises Government on Youth Protests: युवकांचे म्हणणे ऐकून त्यांना समजावून सांगण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा भर; सरकार, पोलिसांनी संयम राखत शांततापूर्ण आंदोलनाला प्रोत्साहन द्यावे, आक्रमक पावले टाळावीत असा स्पष्ट संदेश
Supreme Court
Supreme Courtsakal
Updated on

नवी दिल्ली: ‘‘काही भरकटलेल्या युवकांनी दगडफेक केली तरी त्यांना शांत करण्याचा व समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिस आणि सुरक्षा संस्थांनी केला पाहिजे. दुसरीकडे सरकारनेदेखील आक्रमक भूमिका घेणे टाळावयास हवे,’’ असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राज्य सरकारांसह कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या संस्थांना आज दिला. युवकांचे म्हणणे ऐकून घेणे हे सर्वांत मोठे शस्त्र असल्याची टिप्पणीदेखील खंडपीठाने केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com