
नवी दिल्ली : ग्राहकास सदनिकेचा (फ्लॅट) ताबा देण्यात विलंब झाला असेल किंवा त्याला ताबा देणेच शक्य नसल्याची स्थिती निर्माण झाल्यास त्या ग्राहकाच्या गृहकर्जाचे व्याज देण्यास संबंधित विकसक बांधील नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे अधिकार आणि विकसकांचे दायित्व या निकालामुळे स्पष्ट झाले आहे.