'Magic Masala' शब्द कोणीही वापरू शकतं, SC चा नेस्लेला दिलासा

SC dismissed plea against nestle
SC dismissed plea against nestlegoogle

नवी दिल्ली : नेस्ले (Nestle) कंपनीला त्याच्या इन्स्टंट नूडल्सच्या संदर्भात 'मॅजिक मसाला' हे टॅगलाईन वापरण्यापासून रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. याबाबत ITC लिमिटेडने मद्राम उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, एकल न्यायालयाधीशांनी दिलेल्या आदेशात हस्क्षेप करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

SC dismissed plea against nestle
पेन्शनधारकांच्या फायद्यासाठी केंद्राने आणले नवे तंत्रज्ञान

ITC लिमिटेडने २०१० मध्ये 'मॅजिक मसाला' फ्लेवर आणला होता. त्यानंतर नेस्लने २०१३ मध्ये 'Maggi Xtra Delicious Magical Masala' हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली. मॅजिक मसाला हा आमच्या ट्रेडमार्कशी संबंधित असल्याचा दावा ITC ने केला होता. नेस्लेने त्याच टॅगचा वापर केल्यामुळे लोकांच्या मनात आमच्या उत्पादनाबाबत गोंधळ निर्माण होईल, असा आयटीसीचा दावा होता. ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या हेतून नेस्लेने सारखी टॅगलाईन वापरल्याचा आरोप आयटीने केला होता. तसेच ही टॅगलाईन वापरण्यापासून नेस्लेला रोखण्यात यावे यासाठी मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांसमोर याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने दोन वेगळे ब्रँड ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतात हा युक्तिवाद फेटाळून लावत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. ''मॅजिक मसाला हे कोणालाही वापरता येईल. त्यावर कोणाचा विशेषाधिकार नाही'', असं एकल न्यायाधीशाच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांनी देखील एकल न्यायाधीशांनी दिलेला आदेश कायम ठेवला. आव्हान दिलेले शब्द हे ITC चे ट्रेडमार्क नाहीत. तुमचा ट्रेडमार्क पूर्णपणे वेगळा होता. कोणीही मॅजिक मसाला किंवा मॅजिक किंवा मसाला वापरू शकतो, असे खंठपीठाने म्हटले होते. त्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com