राफेल खरेदी घोटाळा प्रकरणी, नवी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rafel

राफेल खरेदी घोटाळा प्रकरणी, नवी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

राफेल प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची नवी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत फ्रेंच पोर्टलच्या दाव्यानुसार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास करण्याची मागिणी केली होती. याचिकाकर्ते एमएल शर्मा यांनी सादर केले की डसॉल्ट एव्हिएशनने एका वादग्रस्त भारतीय एजंटला 10 लाख युरो दिले होते.

जर ते फ्रेंच सरकारने मंजूर केलेले दस्तऐवज असेल तर, करार रद्द करण्यासाठी कायद्याचे नियम लागू केले जाऊ शकतात. देशात राफेल या लढाऊ विमानाच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचं फ्रेंच पोर्टलच्या दाव्यानुसार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वकील एमएल शर्मा यांनी फ्रेंच पोर्टलच्या दाव्यावर याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाकडून स्वतंत्र तपासाची मागणी केली होती.

हेही वाचा: झारखंड आमदारांच्या खरेदीसाठी केंद्राने वाढवल्या तेलाच्या किमती; CM अरविंद केजरीवाल

हा करार रद्द करून दंडासह संपूर्ण रक्कम वसूल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यासोबत या प्रकरणाची चौकशी कोर्टाच्या देखरेखेत स्वतंत्र तपास करण्यासाठी आदेशाची मागणी केली होते. पोर्टलने दावा केला आहे की राफेल बनवणारी फ्रांसीसी कंपनी डसॉल्टला भारतातील एका एजंटला सुमारे 8 कोटी 62 लाख रुपये 'भेट म्हणून' दिले होते.

Web Title: Supreme Court Dismisses Petition Related Independent Investigation Rafale Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme Court