'अग्निपथ'च्या घोषणेनंतर हिंसाचार; SIT चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agneepath Scheme Supreme Court SIT

'दिल्ली उच्च न्यायालय अग्निपथ योजनेशी संबंधित अर्जावर सुनावणी करत आहे.'

'अग्निपथ'च्या घोषणेनंतर हिंसाचार; SIT चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या (Agneepath Scheme) घोषणेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये झालेला हिंसाचार आणि जाळपोळीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) फेटाळून लावलीय.

सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की, दिल्ली उच्च न्यायालय अग्निपथ योजनेशी संबंधित अर्जावर सुनावणी करत आहे, त्यामुळं या अर्जावर सुनावणी करण्यात काहीच अर्थ नाही, असं नमूद केलंय. अधिवक्ता विशाल तिवारींनी त्यांच्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, 'केंद्राच्या नवीन लष्करी भरती (Indian Army Recruitment) योजनेच्या 'अग्निपथ' विरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या हिंसक निषेधांची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करावी.'

हेही वाचा: Anant Chaturdashi Live Update : गणपती मिरवणुकीत अंबादास दानवेंनी वाजवला ढोल

विशाल तिवारींनी या वर्षी जूनमध्ये दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की, नवी दिल्ली-भागलपूर विक्रमशिला एक्स्प्रेस आणि नवी दिल्ली-दरभंगा बिहार क्रांती एक्स्प्रेसच्या किमान 20 बोगी संतप्त उमेदवारांनी जाळल्या आणि बिहार राज्यातील महामार्ग रोखले. आंदोलनाची तीव्रता एवढी होती की, पूर्व मध्य रेल्वेला 164 गाड्या रद्द कराव्या लागल्या. राष्ट्रीय स्तरावर 300 हून अधिक आंतरराज्य गाड्या प्रभावित झाल्या आणि 200 हून अधिक मोठ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असं त्यांनी नमूद केलं. याचिकाकर्त्यानं सशस्त्र दल आणि राष्ट्रीय सुरक्षेवर अग्निपथ योजनेचा प्रभाव तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: धक्कादायक! तंबाखू खाण्यावरुन सुवर्ण मंदिराबाहेर राडा, भररस्त्यात एकाची हत्या

Web Title: Supreme Court Dismisses Petition Seeking Sit Probe Into Violence Over Agneepath Scheme Indian Army Recruitment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..