
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देताना बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) दोषी ठरविण्यात आलेल्या एका तरुणाची तुरुंगवासाची शिक्षा माफ केली. ‘या प्रकरणातील व्यवस्थात्मक अपयश स्पष्टपणे दिसून येते, आता पीडितेबरोबरच तिच्या मुलास देखील न्याय देणे गरजेचे आहे,’ असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले.