Thackeray Vs Shinde : सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान काय घडलं? वाचा

bjp pravin darekar
bjp pravin darekar sakal media

कायद्याचा पेच निर्माण झाला - छगन भुजबळ

कायद्याचा पेच निर्माण झाला आहे. शिंदे गट म्हणत आहे की दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. पक्षांतर्गत विषयात कोर्ट हस्तक्षेप करत नाही. शिवसेना त्यांची बाजू सांगत आहे. शिंदे गटाने व्हीप मोडला आहे. बैठकीला यायला सांगितल असता तिथे उपस्थिती न दाखवता थेट गुवाहाटी जाऊन बैठक करतात हे चुकीचं आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

देशात लोकशाही आहे हुकूमशाही नाही : प्रवीण दरेकर

दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 29 जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात लोकशाही आहे हुकूमशाही नाही, लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व असतं. शिंदे-फडणवीस सरकारकडे बहुमत आहे आणि शिवसेनेतून असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे रडीचा डाव खेळणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवीण दरेकर यांनी दिली आहे

घटनापीठासमोर सुनावणी होणं गरजेचं - देवेंद्र फडणवीस

आजच्या सुनावणीमध्ये आम्ही समाधानी आहोत. घटनापीठासमोर सुनावणी होणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूंनी आपलं म्हणणं मांडलं असून आजच्या निर्णयाबाबत आम्ही समाधानी आहोत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अपात्रतेच्या नोटीसीसंदर्भात परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे घटनापीठासमोर सुनावणी होणे गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार

महाराष्ट्राती सर्वोच्या न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडून 27 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. तर 1 ऑगस्टला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी होणार आहे.

पत्रिज्ञापत्र सादर करण्याच्या कोर्टाच्या सूचना

दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मंगळवारपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता एका आठवड्यासाठी ही सुनावणी लांबणीवर पडली आहे.

गटनेता हटवणं हा पक्षातंर्गत विषय - सरन्यायाधीश

सुनावणीदरम्यान, विधिमंडळात गटनेत्याला हटवण हा पक्षातंर्गत विषय आहे, ज्याच्याकडे बहुमत आहे त्याला गटनेता हटवण्याचा अधिकार असल्याचे महत्त्वपूर्ण मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले आहे.

प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केलं जावं

मोठ्या खंडपीठापुढे प्रकरण वर्ग करता येईल अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीश रमण्णा यांनी व्यक्त केली आहे. मात्र, हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जावं असा आदेश दिलेला नाही. मात्र, याबाबत आपण गांभीर्याने विचार करत असल्याचे रमण्ण यांनी म्हटले आहे.

वेळ वाढवून देण्याची शिंदे गटाकडून मागणी

कागद पत्र सादर करण्यासाठी एक आठवड्यांचा वेळ द्या अशी मागणी शिंदे गटाचे वकील साळवी यांनी कोर्टाकडे केली आहे. मात्र, या मागणीवर सिब्बल यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. हे प्रकरण महत्त्वाचे आसल्याने त्यावर त्वरीत निकाल लावणे गरजेचे म्हटले आहे. यावर सरन्यायाधीशांनी वेळेची समस्या नाही, परंतु काही घटनात्मक मुद्दे आहेत ज्यांचे निराकरण त्वरीत करणे गरजेच असल्याची टिप्पणी सरन्यायाधीन रमण्णा यांनी केली आहे.

लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवता येतो

एका सीएमच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्या सीएमने शपथ घेणे चुकीचे नाही. तसेच पक्षात आवा उठवणे चुकीचं नाही. लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवता येतो असे साळवी यांनी म्हटले आहे. कारण शिंदे गटाकडून पहिल्या दिवसापासून आम्ही शिवसेनेविरोधात कोणतेही काम केलेले नाही असे स्पष्ट करत आले आहे. त्यामुळे लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवता येतो असे साळवी यांनी म्हटले आहे. 20 आमदारांचा पाठिंबा न मिळालेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद बहाल करावं या कल्पनेत आपण आहोत का? अशी विचारणा हरिश साळवे यांनी केली आहे.

शिंदे गटाकडून हरीश साळवींचा युक्तीवाद सुरू

सिंघवी यांच्या युक्तीवादानंतर आता शिंदे गटाकडून हरीश साळवी यांच्या युक्तीवादाला सुरूवात झाली आहे. एखाद्या पक्षाला नवा नेता हवा असेल तर त्यात काही गैर काय असे साळवींनी कोर्टात म्हटले आहे. फूट तेव्हाच मानली जाते जेव्हा तुम्ही दुसऱ्या पक्षात जाता असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील साळवी यांनी केला आहे. तसेच पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी एखादी तक्रार असणे गरजेचे असल्याचेही साळवी यांनी बाजू मांडतांना म्हटले आहे.

सिबल्लांकडून राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टाचा उल्लेख

सुनावणीदरम्यान, कपिल सिब्बल यांनी राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अशाप्रकारे कोणतेही सरकार पाडले जाऊ शकते. याशिवाय सिब्बल यांनी शिंदे यांच्या शपथविधीवरही आक्षेप घेतला आहे. राज्यपाल यांनी सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना शपथविधीसाठी बोलावणे अयोग्य होते असेही त्यांनी कोर्टाता म्हटले आहे.

बंडखोर योग्य तर उपाध्यक्षांचा निर्णय़ चुकीचा असं कसं होऊ शकतं, असा प्रश्नही सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. शपथविधी कसा झाला? इथं घटनेची पायमल्ली झाली आहे.

उद्धव ठाकरेंकडून अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद

ठाकरे गटाकडून अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करत आहे. गुवाहाटीला गेल्यावर शिंदे गटाने केलेला मेल हा अनधिकृत बोता, असंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सिंघवी यांच्याकडून रेबिया प्रकरणाचा दाखला देण्यात येत आहे.

शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, तसंच १९ पैकी १२ खासदार आता शिंदे गटाच्या बाजूने आहेत. त्यामुळे आपणच खरी शिवसेना म्हणून ओळखले जावे यासाठी शिंदे गटाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. काल संध्याकाळी याबाबतच पत्र शिंदे गटाने आयोगाला दिल्याची माहिती मिळत आहे. तर ठाकरे गटाने आधीच पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केल्यास त्यांचं मत ऐकून घ्यावं अशी विनंती आयोगाला केली होती.

शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून आम्हालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी केल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं.

न्यायालयात कोणत्या याचिकांवर होणार सुनावणी

शिवसेनेचे गटनेते कोण एकनाथ शिंदे की अजय चौधरी यावर आज निर्णय होणार आहे. शिवाय शिवसेनेचे अधिकृत प्रतोद सुनील प्रभू की भरत गोगावले, सभागृहामध्ये कोणाला व्हीप लागू होईल, तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, १६ आमदारांना उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस वैध की अवैध, त्यांच्यावर कारवाई होणार का, ठाकरेंसोबतच्या आमदारांचं काय होणार, शिंदे गट हीच खरी शिवसेना असेल की वेगळ्या गटात विलीन व्हावं लागेल, असे अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.

Maharashtra Political Crisis Live updates : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपाच्या मदतीने राज्यात युतीचं सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यात अनेक घडमोडींना वेग आला आहे. बंडखोरीनंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. कोर्टाच्या निर्णयावरच राज्य सरकार आणि शिवसेनेच्या पुढील भवितव्याचा फैसला होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असून आज नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे. (Maharashtra Political Crisis Live updates)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com