esakal | सरकारसोबत आम्हाला संघर्ष नकोय; केंद्राला SC ने फटकारले
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी नियुक्त्यांची आठवण करून देताना सरन्यायाधीश म्हणाले की, आम्हाला सरकारसोबत कोणताही संघर्ष नको आहे.

सरकारसोबत आम्हाला संघर्ष नकोय; केंद्राला SC ने फटकारले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ट्रिब्यूनलमध्ये रिक्त जागांवरून केंद्र सरकारला फटकारले आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी म्हटलं की, आम्हाला वाटतं की सरकारला या न्यायालयाच्या निर्णय़ाचा काही आदर नाही. तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा घेत आहात असाही इशारा सरन्यायाधीशांनी दिली. सरकारला आवश्यक त्या नियुक्त्या करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली असून त्यासंदर्भात नोटीसही सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी नियुक्त्यांची आठवण करून देताना सरन्यायाधीश म्हणाले की, आम्हाला सरकारसोबत कोणताही संघर्ष नको आहे. मात्र ट्रिब्यूनलच्या रिक्त जागा का भरल्या जात नाहीयेत असा प्रश्नही त्यांनी विचारला. केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालायने ही नोटीस काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून देण्यात आली आहे.

हेही वाचा: Flipkart च्या सहसंस्थापकांची 'HC'त धाव, ED च्या नोटीसला आव्हान

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी पुढच्या आठवड्यात सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. तसंच अवमानप्रकरणी कारवाई करू अशा इशाराही दिला आहे. केंद्राकडून नियुक्तीचे आदेश दिले जातील अशी आशाही स्रवोच्च न्यायालयाने व्यक्त केली. जर केंद्राने नियुक्त्या केल्या नाहीत तर न्यायालय आदेश देईल असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

loading image
go to top