esakal | Breaking : JEE आणि NEET परीक्षा होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, परीक्षा होणारच
sakal

बोलून बातमी शोधा

JEE Exam

येत्या सप्टेंबर महिन्यात या दोन्ही परीक्षा होणार आहेत.

Breaking : JEE आणि NEET परीक्षा होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, परीक्षा होणारच

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली New Delhi : JEE Main 2020 आणि NEET 2020 या परीक्षा (Exam) यंदा रद्द करण्या संदर्भात सुप्रीम कोर्टात (Supreme court) दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात आलीय. त्यामुळं दोन्ही परिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात या दोन्ही परीक्षा होणार आहेत. त्याचबरोबर शिक्षणाशी निगडीत सर्व गोष्टी सुरू करायला हव्यात, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी व्यक्त केलंय. 

शिक्षण विषयक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे पार्श्वभूमी?
कोरोना व्हायरस आणि त्यानंतर आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर 11 विद्यार्थ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज, खंडपीठाने निकाल दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षाच रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर कोर्टाने 'काय काय बंद करायचे?' असा प्रश्न उपस्थित केला. कोरोनाचा विषय अजून वर्ष दीड वर्षे सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित गोष्टी सुरू करायला हव्यात, असंही कोर्टानं म्हटलंय. 

कधी होणार परीक्षा?
कोर्टाने निकाल दिल्यामुळं यंदा दोन्ही परीक्षा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यात JEE Main परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान, होण्याची शक्यता आहे. तर, NEET परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळं JEE Main आणि NEET परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाच्या निर्णयाकडं सगळ्यांच लक्ष लागलं होतं. परीक्षा रद्द न करता ती वेळेत व्हावी, अशी शिक्षण क्षेत्रातील अनेकांची इच्छा होती. अखेर कोर्टानेही तशाच पद्धतीने निकाल दिल्यामुळं परिक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.

loading image