एका पक्षाकडून निवडणूक जिंकली नंतर पक्षांतर... आता निवडणुकीचा खर्चही वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

Supreme Court Notice on Anti-Defection Law PIL : पक्षांतरबंदी कायद्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आमदार-खासदार राजीनामा देत असल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली.
Supreme Court of India seeks responses from the Central Government, Election Commission and Law Commission on a PIL challenging the use of resignations to evade disqualification under the Anti-Defection Law

esakal

Updated on: 

पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरण्याची कारवाई टाळण्यासाठी काही खासदार आणि आमदारांकडून जाणीवपूर्वक राजीनामे दिले जात असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि संस्थात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची न्यायालयाने दखल घेतली आहे. सोमवारी (२३ नोव्हेंबर) या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि भारतीय विधी आयोगाला नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागवले आहे.

Loading content, please wait...