Supreme Court: ओबीसी क्रिमी लेयरवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र सरकार तणावात; स्पष्टीकरणासाठी याचिका

Supreme Court 11 March OBC Creamy Layer Decision : सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी क्रिमी लेयर निर्णयामुळे CSE-2025 सेवा वाटपावर परिणामाची शक्यता; केंद्राने स्पष्टीकरणासाठी याचिका दाखल केली.
OBC Creamy Layer

The Supreme Court’s OBC creamy layer ruling has raised questions over the implementation of CSE-2025 service allocation

esakal

Updated on

OBC Creamy Layer: केंद्र सरकारने ओबीसी क्रिमी लेयरसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या ११ मार्चच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण आणि योग्य निर्देश मिळावेत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) दाखल केलेल्या या याचिकेत २०१६ पासून नागरी सेवा परीक्षा (CSE) उत्तीर्ण झालेल्या, मात्र क्रिमी लेयरच्या निकषामुळे ओबीसी प्रवर्गाचा दावा नाकारण्यात आलेल्या सुमारे १०० उमेदवारांच्या प्रकरणांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com