Supreme Court: हिजाब मुलांना सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील बनवू शकतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court

Supreme Court: हिजाब मुलांना सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील बनवू शकतो

नवी दिल्ली : सध्या देशभरात हिजाब प्रकरणावरून वाद सुरू असून हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. यावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला असून, विद्यार्थिनींना शाळेत किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देणे ही भारतीय विविधता जाणून घेण्याची एक संधी असू शकते असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

(Hijab Row Supreme Court Latest Updates)

हिजाब वादावरील याचिकेवर सुनावणी करताना बुधवारी कोर्टाने सांगितलं की, "विद्यार्थिनींना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देणे याकडे भारतातील विविधतेबद्दल जाणून घेण्याची एक प्रभावशाली संधी म्हणून देखील पाहिले जाऊ शकते" असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: Mumbai Local : दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, "वर्गात विविधतेला परवानगी दिल्याने मुले सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील बनू शकतात याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचबरोबर विविधता जपण्यासाठी ही दिली जाणारी संधी असू शकते. आपल्याकडे सगळ्या धर्माचे आणि संस्कृतीतून आलेले विद्यार्थी आहेत. आपण देशातील विविधता बघितली पाहिजे, त्याचबरोबर सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील व्हायला पाहिजे" असं मत खंडपीठाने व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: CM शिंदे-अमित शाहांमध्ये दिल्लीत 'रात्रीस बैठक चाले..?'

दरम्यान, ज्येष्ठ वकील आर वेंकटरामानी यांनी शिक्षकातर्फे युक्तिवाद केला. हिजाबसारख्या सर्व प्रकारच्या सर्व विचलितांपासून मुक्त शाळा हवी असल्याची मागणी शिक्षकांनी केली होती. त्यामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाबसाठी विरोध शिक्षकांकडून केला जात होता.

Web Title: Supreme Court On Hijab Row College Student Karnatka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme CourtHijab Row