दिल्ली प्रदुषणाला शेतकरी नाही तर कोण जबाबदार? सुप्रीम कोर्टाने म्हटलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi
दिल्ली प्रदुषणाला शेतकरी नाही तर कोण जबाबदार? सुप्रीम कोर्टाने म्हटलं...

दिल्ली प्रदुषणाला शेतकरी नाही तर कोण जबाबदार? सुप्रीम कोर्टाने म्हटलं...

राजधानी दिल्लीत सध्या हवा प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा नागरिकांना सामना करावे लागत असल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे. न्यायालयाने आता या मुद्दयावरून दिल्ली सरकारला योग्य पावलं उचलण्यास सांगितले आहे. त्यातच आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाव सूनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचं विधान केलं आहे.

पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान जाळल्याने हे प्रदूषण होत असल्याची तक्रार केली जाते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने यावर एक महत्वाचं विधान केलं आहे. दिल्लीतील खराब होत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेसाठी शेतकऱ्यांनी जाळलेल्या धानाला पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केलं आहे.

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, फटाके, औद्योगिक उत्सर्जन, धूळ इत्यादी गोष्टी सुद्धा प्रदूषणाची कारणे आहेत.

loading image
go to top