

Packaged Food Warning Labels Under Supreme Court Scrutiny As Court Questions Centre Over Delay In Consumer Safety Measures
sakal
नवी दिल्ली: पॅकेज्ड फूडवर(हवाबंद पाकिटातील अन्न) धोक्याच्या सूचना देण्याबाबत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) निर्णय न घेतल्यास आम्ही स्वतः आदेश देऊ, असा कडक इशारा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर दर्शनी भागात इशारा देणारे लेबल लावण्याबाबत केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.