Supreme Court : वसीम रिझवी-यती नरसिंहानंदांच्या अटकेची याचिका स्वीकारण्यास SC चा नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court Yeti Narasimhananda

'मुस्लिमांसह जगातील प्रत्येक व्यक्तीनं माझं पुस्तक वाचलं पाहिजे.'

Supreme Court : वसीम रिझवी-यती नरसिंहानंदांच्या अटकेची याचिका स्वीकारण्यास SC चा नकार

नवी दिल्ली : जितेंद्र त्यागी (Jitendra Tyagi) ऊर्फ ​​वसीम रिझवी आणि यती नरसिंहानंद (Yeti Narasimhananda) यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या भारतीय मुस्लिम शिया इस्ना अशारी जमातच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) नकार दिलाय. त्यागी यांच्या 'मुहम्मद' या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही याचिकाकर्त्यानं केलीय.

'जगातील प्रत्येक व्यक्तीनं माझं पुस्तक वाचावं'

याआधी रिझवी यांनी यूट्यूब चॅनलवरील संभाषणात अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आपल्या पुस्तकाबाबत ते म्हणाले, मुस्लिमांसह जगातील प्रत्येक व्यक्तीनं माझं पुस्तक वाचलं पाहिजे. जर कोणी हे पुस्तक वाचलं, तर तो इस्लाम स्वीकारणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Gujarat : अंबाजी दर्शनासाठी जाणाऱ्या 12 भाविकांना कारनं चिरडलं; 6 जणांचा जागीच मृत्यू

पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींचे 350 संदर्भ दिले आहेत, असा त्यांचा दावा आहे. हे पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. मला जी लपलेली तथ्ये पटकन सापडत नव्हती, ती सापडली असून ती पुराव्यासह अधोरेखित केली आहेत, त्यात पुस्तकांचे 350 संदर्भ आहेत, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: INS Vikrant : 'विक्रांत' केवळ युद्धनौका नाहीय, भारताच्या कठोर परिश्रमाचा हा पुरावा आहे : नरेंद्र मोदी

Web Title: Supreme Court Refused To Entertain A Plea Seeking The Arrest Of Jitendra Tyagi And Yati Narsinghanand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..