Arvind Kejriwal: केजरीवालांना दिलासा नाहीच! तत्काळ सुनावणी नाहीच; केजरीवालांची याचिका कोर्टाने फेटाळली

Arvind Kejriwal: अटकेला आक्षेप घेणारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती
Arvind Kejriwal
Arvind KejriwalEsakal

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) झालेल्या अटकेला आक्षेप घेणारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. केजरीवाल यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; पण त्यावर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. आता केजरीवाल यांना पुढील सुनावणीसाठी सोमवारपर्यंतची वाट पाहावी लागेल.

‘ईडी’कडून झालेली अटक आणि न्यायालयाने सुनावलेल्या कोठडीच्या विरोधात केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र तिथेही न्यायालयाने ‘ईडी’ने पुरेशा पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना अटक केली असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यावर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

केजरीवाल यांच्या याचिकेची सुनावणी घेण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापले जाणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. या याचिकेवर लवकर सुनावणी घेणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद ॲड. अभिषेक मनू सिंघवी यांनी केला असता तुम्ही याचिकेच्या संदर्भात ई - मेल केला आहे का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी त्यांना केली.

Arvind Kejriwal
Delhi Liquor Policy : उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात धाव

दोनदाच भेटता येणार

आठवड्यातून पाचवेळा वकिलांना भेटण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणारी केजरीवाल यांची याचिका राउज अव्हेन्यू न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आता आठवड्यातून दोनदाच त्यांना वकिलांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. केजरीवाल यांच्याविरोधात ३५ ते ४० खटले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खटल्यांच्या अनुषंगाने वकिलांशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ हवा असल्याचा युक्तिवाद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी केला.

एखादी व्यक्ती तुरुंगातून सरकार चालविण्याचा पर्याय निवडत असेल तर त्याला अपवाद मानले जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीला विशेषाधिकार दिले जाऊ शकत नाहीत, असे ‘ईडी’ने सांगितले. बैठकांचा अन्य कारणांसाठी दुरुपयोग केला जात असल्याचा आक्षेपही घेण्यात आला.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपमध्ये भूकंप? 10 पैकी 7 खासदार गायब

विनंती फेटाळली

तिहार तुरुंगात जाऊन केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी दिली जावी अशी विनंती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह यांनी केली होती पण ती फेटाळून लावण्यात आली आहे. तुरुंगाचे कामकाज नियमानुसार चालत असते. नियमानुसार पुढील वेळ दिला जाईल, असे तुरुंग प्रशासनाकडून उभय नेत्यांना सांगण्यात आले आहे.

भाजपचे आंदोलन

केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी ‘आप’ मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचे फवारे मारण्यात आले. या वेळी झालेल्या झटापटीत दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हे किरकोळ जखमी झाले. त्यांना लगेच उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले.

Arvind Kejriwal
AAP Govt News : 'आप'ला पुन्हा मोठा धक्का! दिल्ली सरकारमधील बड्या मंत्र्याने दिला राजीनामा

‘तिहार तुरुंगाला छळछावणीचे स्वरुप’

आम आदमी पक्षाच्या आमदारांना दिल्लीकरांच्या सेवेचा संदेश पाठविल्यावरून तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू झाली असून केंद्र सरकार तिहार तुरुंगाला छळछावणी बनवू पाहात आहे, असा खळबळजनक आरोप आप नेते व खासदार संजय सिंह यांनी आज केला.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Arrest : तिहार तुरुंगाला छळछावणीचे स्वरूप; 'आप'च्या खासदाराचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांना मिळणाऱ्या कथित वागणुकीवरून संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर आरोप केला. ते म्हणाले, ‘‘केजरीवाल यांना सरकार हिटलरशाही पद्धतीने तुरुंगात ठेवत आहे. तुरुंगात गंभीर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांच्याही मानवाधिकारांचे पालन केले जाते आणि ते कुटुंबीयांशी, वकिलांशी चर्चा करू शकतात. परंतु केजरीवाल यांचा हा हक्क हिरावून घेतला जात आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com