लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्रांना मोठा दणका, न्यायालयाकडून जामीन रद्द

Lakhimpur Kheri Case | Supreme Court rejects bail to Ashish Mishra
Lakhimpur Kheri Case | Supreme Court rejects bail to Ashish Mishrasakal

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. यात मिश्रांना दणका मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केला आहे. तसेच मिश्राला एका आठवड्यात न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात दिवसात आत्मसमर्पण करावं, असं कोर्टाने म्हटलंय. (Lakhimpur Kheri Violence)

यापूर्वी 4 एप्रिलला सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. यानंतर निर्णय राखीव ठेवण्यात आला. 10 फेब्रुवारीला अलाहाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन दिला होता. मात्र, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर जामीन मंजूर करण्यास नकार देण्यात आला. यापूर्वी ते चार महिने कोठडीत होते. लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Supreme Court Rejects Bail to Ashish Mishra)

लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या हिंसाचाराची घटना समोर आल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला होता.

त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ही चारचाकी चालवत असल्याचं प्रथमदर्शनी उघडकीस आलं. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मिश्रांना दणका बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com