Supreme Court : कोर्टाकडून ‘ईडी’ची कानउघाडणी, सरकारी वकिलांना तुम्ही थेट आदेश देऊ शकत नाहीत
Supreme Court restrict ED : सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना सरकारी वकिलांना थेट आदेश देण्यापासून रोखले. कोर्टाने तपाससंस्थेचा न्यायालयीन प्रक्रियेवरील प्रभाव चापला.
नवी दिल्ली (पीटीआय) : सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कानउघाडणी केली. ‘ईडी’चे अधिकारी आणि तिचे संचालक हे सरकारी वकिलांना आदेश देऊ शकत नाहीत, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत.