
नवी दिल्ली : उत्तरप्रदेश सरकार आणि प्रयागराज प्रशासन यांच्या बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने आज कठोर शब्दांत ताशेरे ओढताना ही कारवाईच घटनाबाह्य अन् अमानवीय ठरविली आहे. तुमचे हे कृत्य पाहून आमच्या विवेकबुद्धीलाच मोठा धक्का बसला आहे. निवाऱ्याचाही काही तरी अधिकार असतो त्याचीही कायदेशीर प्रक्रिया असते, अशा शब्दांत न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला सणसणीत चपराक लगावली.