

Traffic Challan
esakal
Traffic Challan: थकित ट्रॅफिक ई-चलानची रक्कम वसूल करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ती थेट वीज बिलाशी जोडण्याचा विचार करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र आणि राज्य सरकारांना केली आहे. प्रलंबित दंड वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केवळ ई-चलान जारी करून न थांबता प्रत्यक्ष जमिनीवर ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.