

Supreme Court of India on teachers absorption in college
esakal
नवी दिल्ली : एखाद्या शिक्षकाने पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असली, तरी केवळ त्या आधारावर त्याला विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील मंजूर नसलेल्या पदावर सामावून घेण्याचा अधिकार मिळत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पद अस्तित्वात नसताना केवळ पात्रतेच्या आधारे नियुक्ती किंवा सामावून घेण्याचा हक्क निर्माण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने संबंधित प्राध्यापकाची अपील फेटाळून झारखंड उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला.