
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिस त्यांच्याकडील सत्तेचा अधिकार गाजवीत असले तरी त्यांनी कारवाई करताना संवेदनशीलता दाखविण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील अनुराग दुबे यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल केल्यास सुनावणी कशी घ्यायची, असा सवाल विचारत, यापुढे दुबे यांना हात लावाल तर अत्यंत कठोर आदेश द्यावा लागेल, असा इशाराही न्यायालयाने दिले.