अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

राज्यांनी अंतिम वर्षाची परीक्षेची तारीख बदलून त्या घ्याव्यात. परीक्षेचा निर्णय युजीसीने घेतला असून या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. 

नवी दिल्ली - एखाद्या राज्याला परीक्षा घ्यायची नसेल तर युजीसीसोबत चर्चा करावी असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. युजीसीच्या परवानगीशिवाय परीक्षा रद्द करता येणार नाही. राज्यांनी अंतिम वर्षाची परीक्षेची तारीख बदलून त्या घ्याव्यात. परीक्षेचा निर्णय युजीसीने घेतला असून या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. 

कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षावर मोठा परिणाम झाला आहे. दहावी- बारावीच्या परीक्षेचे उर्वरित पेपर रद्द करून निकाल जाहीर करण्यात आले. तर महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील पदवी परीक्षाही रद्द करण्यात आल्या. मात्र यामध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत युजीसीने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने निर्णय दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court Verdict on final year exams UGC Guidelines