मोठी अपडेट! मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 14 नोव्हेंबरला होणार सुनावणी

मोरबी जिल्ह्यात केबल पूल कोसळल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय.
Morbi Bridge Collapse
Morbi Bridge Collapseesakal
Summary

मोरबी जिल्ह्यात केबल पूल कोसळल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय.

नवी दिल्ली : गुजरातमधील (Gujarat) मोरबी जिल्ह्यात केबल पूल कोसळल्याचं (Morbi Bridge Collapse) प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलंय. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यासाठी तातडीनं निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीय. आता सुप्रीम कोर्टानं 14 नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचं मान्य केलंय.

Morbi Bridge Collapse
आता Elon Musk स्वत: ट्विटरचे CEO बनणार; सर्व संचालक मंडळ बरखास्त!

पंतप्रधान मोदींची आढावा बैठक

मोरबी येथील पूल दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी गांधीनगरमध्ये अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अपघाताची माहिती घेतली आणि जखमींना पूर्ण मदत करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 नोव्हेंबरला राज्यात राजकीय शोक जाहीर करण्याचा निर्णय घेतला. बचाव आणि मदत कार्यात कोणताही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

Morbi Bridge Collapse
PHOTO : बाबा, मला महाराष्ट्रात जायचंय! चिमुकल्याच्या बॅनरनं वेधलं लक्ष; मराठी भाषिक आक्रमक

पोलिसांनी 9 जणांना केली अटक

मच्छू नदीवरील केबल पूल कोसळून लोकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी 9 जणांना अटक केली. इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत भाजप खासदार मोहन कुंडारिया यांच्या 12 नातेवाईकांचा मृत्यू झालाय. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज म्हणजेच मंगळवारी मोरबीला येणार आहेत. इथं ते पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी त्यांचा रोड शो रद्द केला होता. काँग्रेसनंही आपली परिवर्तन यात्रा दिवसभरासाठी पुढं ढकलली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com