नवी दिल्ली - ‘केंद्रातील मोदी सरकारने भित्रेपणे चीनपुढे केलेल्या शरणागतीमुळे भारताचे धोरणात्मक हित, भौगोलिक अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आले आहे,’ असा आरोप आज काँग्रेसने केला. .‘भारताच्या राष्ट्रीय हिताचे झालेले नुकसान हेच मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य बनले आहे. चीनला ‘लाल डोळे’ दाखविण्याचा दावा प्रत्यक्षात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला ‘लाल सलाम’ देणारा ठरला आहे. भाजप नेहमी काँग्रेसला चीनसोबतच्या भेटींबाबत प्रश्न विचारतो पण चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत भाजपच्या बैठकींमध्ये नेमके काय होते?’’ असा प्रश्न काँग्रेसने केला..‘मोदी सरकारने आपल्या चीनविषयक धोरणाबाबत पूर्ण जबाबदारी आणि पारदर्शकता दाखवावी तसेच चीनचा कम्युनिस्ट पक्ष आणि संघ-भाजपच्या प्रतिनिधींदरम्यानच्या झालेल्या बंद दरवाज्यांतील सर्व बैठकींचा अजेंडा, निष्कर्ष आणि नोंदी सार्वजनिक कराव्या,’ अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते पवन खेडा यांनी आज पत्रकार परिषदेत केली.तसेच चीनबरोबर व्यवहार करताना मोदी सरकारने दाखवलेल्या दुटप्पी भूमिकेने भारताचे परराष्ट्र धोरण गुंतागुंतीचे झाले असून भाजपाच्या चीनविषयक धोरणासाठी ‘एक भित्रे समर्पण’ हा शब्द समर्पक असल्याची टीका खेडा यांनी केली..काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्नचीनचा कम्युनिस्ट पक्ष आणि संघ-भाजपदरम्यान झालेल्या बैठकींमध्ये चीनची घुसखोरी आणि २०२० पूर्वीची स्थिती पुनर्स्थापित करण्याची मागणी होते का?प्रचंड व्यापार-तूट आणि चीनकडून भारतात येणाऱ्या स्वस्त वस्तूंवर चर्चा होते का?दुर्मिळ खनिजे आणि खतांवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला जातो का?अरुणाचल प्रदेशातील भारतीय नागरिकांना ताब्यात घेण्याबाबत चीनला प्रश्न विचारला जातो का?पाकिस्तानला लष्करी मदत करण्याबाबत चीनला जाब विचारला जातो का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले..संघ कार्यालयाला भेटचि नी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) शिष्टमंडळाने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव कुंज येथील मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. तत्पूर्वी या शिष्टमंडळाने दिल्लीत काल भाजप नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. दिल्लीतील झंडेवालान भागातल्या ‘केशवकुंज’ या संघ मुख्यालयाला ‘सीसीपी’च्या शिष्टमंडळाने भेट दिली.‘चिनी शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीमागे कोणताही उद्देश नव्हता. ही केवळ शिष्टाचार भेट होती आणि या भेटीसाठी चिनी शिष्टमंडळाकडून आलेली विनंती मान्य केली. सरसंघचालक मोहन भागवत दिल्ली बाहेर असल्याने ते या बैठकीत उपस्थित नव्हते,’ असे संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले..गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणाव, पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान चीनकडून पाकिस्तानला झालेली सक्रिय मदत या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक भागवत यांच्या व्याख्यानमालेदरम्यान अन्य देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र चिनी राजदूतांना आमंत्रित केले नव्हते. त्यापार्श्वभूमीवर संघ पदाधिकाऱ्यांशी चिनी शिष्टमंडळाची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे..चिनी शिष्टमंडळाने सत्ताधारी भाजपशी आंतर-पक्षीय संवाद वाढवण्यासाठी भाजप मुख्यालयात जाऊन पक्षनेत्यांशी भेट घेतली होती. यावेळी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री सुन हैयान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर भारतातील चीनचे राजदूत झू फेईहोंग देखील उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.