Insecurity Female Doctors : रात्रीच्यावेळी काम करताना असुरक्षित वाटते

देशभरातील महिला डॉक्टरांची भावना ,अनेकींना हवीये शस्त्र बाळगण्याची परवानगी... देशभरातील रुग्णालयांमध्ये रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टरांमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
Insecurity Female Doctors
Insecurity Female Doctorssakal
Updated on

नवी दिल्ली : देशभरातील रुग्णालयांमध्ये रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टरांमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तब्बल एक तृतीयांश महिला डॉक्टरांनी रात्री काम करताना आम्हाला भीती वाटते असे मत मांडले. अनेक महिला डॉक्टरांनी स्वसंरक्षणासाठी सोबत शस्त्र बाळगावे वाटते असे म्हटले आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली आहे. ‘आयएमए’ने यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. अनेक रुग्णालयांमध्ये ड्युटीरूम या नावाला उरल्या असून ४५ टक्के महिला डॉक्टरांनी आम्हाला त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com