esakal | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : सर्वोच्च न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

 sushant singh rajput death case, supreme court rhea chakraborty

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे राहणार की हे बहुचर्चित प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येणार? हे देखील या निकालातून स्पष्ट होणार आहे. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : सर्वोच्च न्यायालय

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात निर्माण झालेला तेढ सोडवण्याच काम आता सीबीआय करणार आहे. रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने निकाल दिला. यात सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश न्यायालयाने दिले. सुशांत सिंह हाजपूतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी पटनामध्ये  दाखल केलेला गुन्हा योग्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे सीबीआयकडे सुपूर्द करावे आणि तपासात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

पटनामध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबईला वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीने केली होती. न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 11 ऑगस्ट रोजी या प्रकरणातील सुनावणी  पूर्ण केली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.   

ईडीने नोंदवला सुशांतच्या वडिलांचा जबाब

14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत गेल्याचे पाहायला मिळाले. हत्या की आत्महत्या? असा प्रश्न चर्चेत आला. दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी बिहारमधील पटना येथे सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार नोंदवली. मुंबईतील घडलेल्या घटनेचा बिहारमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर बिहार पोलिस विरुद्ध मुंबई पोलिसच नव्हे तर दोन्ही राज्यातील सरकारमध्ये ही संघर्षमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांची सर्वोच्च न्यायालयाने बाजू ऐकून घेतली असून यावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावे लागेल.    
 

loading image
go to top