बुहुदा 'त्या' दिवसासाठीच त्या थांबल्या असाव्यात; तीन तासांपूर्वी शेवटचे ट्विट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मोदीजी आपले खूप खूप अभिनंदन, मला या दिवसाची प्रतीक्षा होती; स्वराज यांचे शेवटचे ट्विट

पुणे : पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप अभिनंदन .... मला या दिवसाची प्रतिक्षा होती. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहिली होती. तुम्ही ते करून दाखवले. तुमचे खूप खूप धन्यवाद ! अश्या प्रकारचे ट्विट  केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी रात्री  ७ : २३ मिनिटांनी केले होते. त्यांचे हे शेवटचे ट्विट होते...

सुषमा स्वराज सोशल मीडियावर फार सक्रिय होत्या. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. 'मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी' अशा भावनाही सुषमा यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मावळली.

स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma swaraj last Tweet Congratulate PM modi