Coronavirus : भारतात कोरोनाचा पहिला बळी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 मार्च 2020

- चीनमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू

- कोरोना व्हायरसचे जगभरात थैमान

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या 3 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यानंतर आता या व्हायरसमुळे भारतात पहिला बळी गेला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथे 76 वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरात जवळपास शंभर देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. या सर्वच देशांमधील सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पावले उचलत आहेत. 

Coronavirus : कोरोनाग्रस्तावर 'एचआयव्ही'चा उपचार

तसेच ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नदीन डॉरीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डॉरीस यांनी एक पत्रक जारी करून दिली आहे. यामध्ये डॉरीस यांनी सांगितले, की माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी घरात कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर राहते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected infected with coronavirus died in Karnataka