

Modified SUV ambulance providing immediate help to accident victims on highways.
sakal
जयपूर:अपघात झाल्यावर अनेकवेळा जखमींना वेळीच मदत मिळत नाही. त्यामुळे जीवितहानी वाढते. नेमकी हीच समस्या ओळखून येथील एका कर सल्लागाराने आपल्या आलिशान ‘एसयूव्ही’चे तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णवाहिकेत रूपांतर केले. गेल्या दोन दशकांत या एसयूव्ही रुग्णवाहिकेने अनेक अपघातग्रस्तांना वेळेवर रूग्णालयात पोचवीत अनेकांचे प्राण वाचविले. त्यामुळे, ही रुग्णवाहिका त्यांच्यासाठी ‘संजीवनी’ ठरली आहे.