
CM योगींच्या मंत्र्याचा राजीनामा; भाजपसोडून सायकलवर स्वार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP assembly election) 2022 मध्ये सत्ताधारी पक्ष भाजपला मोठा झटका बसला आहे. योगी सरकारचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (swami prasad maurya) यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मौर्य यांनी आपला राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवला आहे. सध्याचे सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि छोटे व्यापारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मौर्य यांनी केला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते थेट समाजवादी पक्षात गेले. अखिलेश यादव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. फोटोही सोशल मीडियावरून शेअर केला
मौर्य यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कामगार आणि रोजगार आणि समन्वय मंत्री या नात्याने प्रतिकूल परिस्थितीत आणि विचारसरणीत राहूनही त्यांनी जबाबदारी अत्यंत तन्मयतेने पार पाडली, परंतु दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या अत्यंत दुर्लक्षित वृत्तीमुळे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे. असे सांगितले.
Web Title: Swami Prasad Maurya Labour Minister In Ups Yogi Govt Resigns Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..