Swami Prasad Maurya
Swami Prasad Mauryaesakal

Samajwadi Party : भाजप मला ठार मारण्याची सुपारी देतंय; 'समाजवादी'च्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

विशेष वर्गातील लोक मला मारण्याचं कंत्राट देत आहेत, असा आरोपही त्यांनी केलाय.
Published on
Summary

लखनौमध्ये एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमानंतर अयोध्येचे पुजारी राजू दास आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांत हाणामारी झाली.

Lucknow News : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केलाय.

भाजप सरकारला मला ठार मारायचं आहे, असं त्यांनी म्हटलंय. माझ्या नावावर सुपारी दिली जात आहे. विशेष वर्गातील लोक मला मारण्याचं कंत्राट देत आहेत, असा आरोपही त्यांनी केलाय.

Swami Prasad Maurya
हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक साधूच्या वेशात कारस्थान रचत आहेत. मात्र, सरकार काहीच करत नाहीये. मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली जात आहे. माझ्या सुरक्षेसाठी मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवलंय. याबाबत मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांना देखील पत्र पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Swami Prasad Maurya
Political News : कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज भाजपात प्रवेश करणार? स्वामी म्हणाले, मी राजकारणात जाणं..

विशेष म्हणजे, बुधवारी लखनौमध्ये एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमानंतर हनुमान गढीचे समर्थक, अयोध्येचे पुजारी राजू दास आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांत हाणामारी झाली. दरम्यान, स्वामी प्रसाद यांनी लखनौच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याची तक्रार केली होती.

Swami Prasad Maurya
Political News : गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेत्याची घणाघाती टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com