Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Swati Maliwal: दिल्लीच्या आपच्या खासदार स्वाती मालीवाल गेल्या काही दिवसांमध्ये चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे.
Swati Maliwal
Swati MaliwalEsakal

दिल्लीच्या आपच्या खासदार स्वाती मालीवाल गेल्या काही दिवसांमध्ये चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर त्यांनी मारहाणीचे आरोप केले आहेत. या मारहाण प्रकरण आणि आरोपानंतर ‘आप’ पक्ष आणि स्वाती मालिवाल यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे मालीवालांना येणाऱ्या धमक्यात वाढ झाली आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

स्वाती मालिवाल यांनी सोशल मिडीया एक्सवर पोस्ट शेअर करत त्या म्हणाल्या, “माझ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझे चारित्र्यहनन करण्याची मोहीम उघडली आहे. त्यानंतर आता माझ्याबद्दल अश्लील कमेंट करणे, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा प्रकार सुरू केला आहे. तसेच युट्यूबर ध्रुव राठीच्या व्हिडीओनंतर या प्रकारात आणखी वाढ झाली आहे.”

स्वाती मालिवाल पुढे म्हणाल्या, ध्रुव राठीसारखा एक मुक्त पत्रकार आम आदमी पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखा वागत आहे. त्यामुळे मी पीडित असूनही मला अत्यंत वाईट खालच्या दर्जाच्या कमेंट आणि धमक्या येत आहेत. त्यासंबधीचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरती शेअर केले आहेत.

Swati Maliwal
Uttarakhand UCC: लिव्ह-इन पार्टनर 21 वर्षांपेक्षा कमी असल्यास उत्तराखंड सरकार पोलिसांना अन् पालकांना कळवणार; UCC मध्ये तरतुदी

“मी तक्रार मागे घ्यावी, यासाठी माझा पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. त्यासाठी मला धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ध्रुव राठीला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने माझ्या कॉल आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं”, असंही मालिवाल यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्वाती मालिवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ध्रुव राठीने २२ मे रोजी एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. स्वाती मालिवाल यांच्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडलं? याचा व्हिडीओ ध्रुव राठीने बनवला आहे.

Swati Maliwal
Loksabha election 2024 : पत्नीसोबत आलेल्या भाजप उमेदवाराने EVM मशिनची केली तोडफोड; पोलिसांनी केली अटक, नेमकं काय घडलं?

ध्रुव राठीने त्याच्या व्हिडीओमध्ये स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय झाले असावं? याबाबत चर्चा केली आहे. यासाठी त्याने सीसीटीव्ही व्हिडीओ आणि माध्यमात आलेल्या बातम्यांचा आधार घेतला आहे.

मालीवाल पुढे म्हणाल्या, ज्यापर्यंत पक्षाच्या नेतृत्वाचा संबंध आहे, हे स्पष्ट आहे की ते माझी तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. ध्रुवसाठी, मी माझी बाजू समजावून सांगण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याने माझ्या कॉल्स आणि मेसेजकडे दुर्लक्ष केले. हे लज्जास्पद आहे की त्यांच्यासारखे लोक, जे स्वतंत्र पत्रकार असल्याचा दावा करतात, ते इतर 'आप'च्या प्रवक्त्यांसारखे वागू शकतात आणि मी आता अत्यंत गैरवर्तन आणि धमक्यांचा सामना करत आहे.

Swati Maliwal
Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com