

Swine Flu Outbreak In Uttar Pradesh Yogi Government Orders Free Tests And Strengthens Preparedness In Government Hospitals
esakal
उत्तर प्रदेश राज्यात इन्फ्लुएन्झा-ए (H1N1) अर्थात स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने आरोग्य यंत्रणेला सतर्क केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन संसर्गाची स्थिती, रुग्णालयांची तयारी आणि उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला.