

swine ful
esakal
देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि चंदीगडसह अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून नवीन रुग्ण समोर येत आहेत. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, काही राज्यांमध्ये या वर्षी नोंदवलेल्या रुग्णांची संख्या ही मागील वर्षाच्या एकूण रुग्णसंख्येपेक्षाही अधिक झाली आहे.