esakal | काळ्या पैशांविरोधातील लढाईला मोठे यश; स्विस बँकेतील यादी येणार
sakal

बोलून बातमी शोधा

notes

पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये सत्तेत येताच काळ्या पैशाविरोधात लढा सुरु केला होता. विविध प्रकारे सरकारने काळ्या पैशावर अंकुश ठेवण्याचा प्रय़त्न केला होता. आता ही यादी प्रसिद्ध होणार असल्याने सरकारच्या लढाईला मोठे यश मिळणार आहे. स्वित्झर्लंडचे शिष्टमंडळ नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात याविषयी माहितीची देवाणघेवाण करण्याचा निर्णय झाला होता.

काळ्या पैशांविरोधातील लढाईला मोठे यश; स्विस बँकेतील यादी येणार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काळ्या पैशाविरोधात उघडलेल्या लढाईला आज (रविवार) मोठे यश मिळणार आहे. स्विस बँकांमध्ये खाती असलेल्या भारतीयांची यादी आज स्वित्झर्लंड सरकार प्रसिद्ध करणार आहे.

अॅटोमेटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) कायद्यांतर्गत स्वित्झर्लंड स्विस बँकांमध्ये खाती असलेल्या भारतीय खातेदारांची यादी जाहीर करणार आहे. यामध्ये गेल्यावर्षी बंद करण्यात आलेल्या खातेदारकांचाही समावेश असणार आहे. भारतीय प्राप्तिकर विभागाला ही यादी सोपविण्यात येणार आहे. स्विस बँकांमध्ये खाते असलेल्या प्रत्येक भारतीयाचे नावे, त्याचा खाता क्रमांक, सध्याचा बॅलन्स आणि सर्व व्यवहाराविषयी माहिती देणार आहे. त्यामुळे काळ्या पैशाबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये सत्तेत येताच काळ्या पैशाविरोधात लढा सुरु केला होता. विविध प्रकारे सरकारने काळ्या पैशावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता ही यादी प्रसिद्ध होणार असल्याने सरकारच्या लढाईला मोठे यश मिळणार आहे. स्वित्झर्लंडचे शिष्टमंडळ नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात याविषयी माहितीची देवाणघेवाण करण्याचा निर्णय झाला होता.

प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांच्या खात्याची माहिती आपल्याला मिळणार आहे. 2018 मधील सर्व व्यवहारांची माहिती त्यामध्ये असेल. स्विस बँकांमधील माहिती गुप्त ठेवण्याचा काळ गेला असून, यामुळे सरकारला काळ्या पैशाविरोधात मोहिम चालविण्यास मोठी मदत होणार आहे.

loading image
go to top