tajmahal
sakal
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या मुख्य घुमटावर गेल्या आठ महिन्यांपासून लावलेला लोखंडी सांगाडा आता हटवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक आता ताजमहालचे पूर्ण सौंदर्य कोणत्याही अडथळ्याशिवाय डोळ्यांत साठवू शकणार आहेत.