तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात तालिबान राज (Afganistan taliban) येणार हे स्पष्ट झालय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी अत्यंत सूचक विधान केलय. "विनाशकारी शक्ती आणि लोक, जे दहशतीच्या विचाराने साम्राज्य उभं करण्याचा विचार करतात, त्यांचं काही वेळसाठी वर्चस्व निर्माण होतं. पण त्यांचं अस्तित्व कायमस्वरुपी नसतं. ते मानवतेचा आवाज दडपू शकत नाही" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमात बोलत होते.

तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतलाय, त्यावर पंतप्रधान मोदींनी केलेलं हे अत्यंत सूचक विधान आहे. गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या काही प्रकल्पाचे त्यांनी व्हर्च्युअल उद्घाटन केले. "अनेक वेळा सोमनाथ मंदिर उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला. मुर्त्यांची विटंबना करण्यात आली. मंदिराचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्येक विनाशकारी हल्ल्यानंतर मंदिर पुन्हा वैभवाने उभं राहिलं. त्यातून आपल्याला आत्मविश्वास मिळतो" असे मोदी म्हणाले.

हेही वाचा: तालिबानचा कंदहार, हेरातमधल्या भारतीय दूतावासावर छापा

"प्रवास आणि पर्यटनाच्या इंडेक्समध्ये भारत 2013 साली 65 व्या स्थानावर होता. तो 2019 साली 34 व्या स्थानावर पोहोचल्याचे" मोदी म्हणाले. सोमनाथ मंदिर गुजरातमधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून जगभरातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात.

Web Title: Taliban Crisis Pm Modi Says Empires Of Terror Temporary At Somnath Event

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..