S. Jaishankar : दहशतवाद थांबल्यानंतरच बोलणी; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संबंध द्विपक्षीय स्वरूपाचेच असतील
India Pakistan Ties : पाकिस्तानकडून दहशतवादाचा धोका पूर्णपणे संपविण्याची गरज आहे, अन्यथा कोणत्याही चर्चा किंवा कराराची शक्यता नाही, असे स्पष्ट मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मांडले. सिंधू पाणीवाटप करारही सध्या थांबवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : ‘‘सिंधू पाणीवाटप करार सध्या स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सीमेपलीकडील दहशतवाद दृष्यस्वरुपात आणि विश्वासार्हपणे थांबविला जात नाही तोपर्यंत त्यावर चर्चा होणार नाही,’’ असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज स्पष्ट केले.