
Vijay Thalapathy
sakal
चेन्नई : ‘‘माझी राजकीय वाटचाल सुरूच राहील, मात्र यापुढे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार,’’ असे प्रतिपादन तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) प्रमुख विजय यांनी मंगळवारी केले. तमिळनाडूतील करूर येथे शनिवारी (ता. २७) त्यांच्या पक्षाच्या सभे दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी नंतर त्यांनी पहिल्यांदाच एका व्हिडिओच्या माध्यमातून मंगळवारी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘टीव्हीके’च्या अधिकृत हँडलवरून याबाबत व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.