
चेन्नई : तमिळनाडू सरकारने चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची अधिकृत प्रवक्ते म्हणून नेमणूक केल्याची घोषणा सोमवारी केली. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.