Supreme Court: चेंगराचेंगरी’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने CBI चौकशीला दिला हिरवा दिवा; माजी न्यायाधीश अजय रस्तोगी लक्ष ठेवणार
Tamil Nadu Rally: करुर येथील विजय थलपती यांच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरीत ४० लोकांचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले असून माजी न्यायाधीश अजय रस्तोगी यांनी चौकशीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे.
नवी दिल्ली : तमिळनाडूतील करुर येथे तमिलागा वेटरी कझगम (टीव्हीके) पक्षाचे नेते विजय थलपती यांच्या रॅलीवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.