नवलंच! डिजिटल अवतारात मेटाव्हर्सवर लग्न  करणार तामिळनाडूतील जोडपं

नवलंच! डिजिटल अवतारात मेटाव्हर्सवर लग्न करणार तामिळनाडूतील जोडपं

Metaverse Wedding Couple : तामिळनाडूतील एक जोडपे मेटाव्हर्सच्या आभासी दुनियेत आपलं लग्न करण्यासाठी सज्ज आहे. जिथे जगभरातून आलेले पाहूने आभासी पध्दतीने (Virtually) लॉग-ईन करू लग्नामध्ये सहभाग घेऊ शकतात. दिनेश एसपी आणि जनगानंदिनी रामस्वामी यांच्या लग्नाची मेजवानी हॉगवर्ट्स पॅलेस(Hogwarts Palace) भोजन कक्षामध्ये आभासी (Virtually) क्वार्टरमध्ये आयोजीत केली आहे. (Tamil Nadu Couple Dinesh S P and Janaganandhini Ramaswamy will host a wedding reception in Metaverse)

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ''या जोडपे आभासी अवतारामध्ये (Virtual Avaatar) आपल्या पाहूण्यांना मेटाव्हर्सच्या ठिकाणी भेटणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये एक खास पाहुणे देखील आहे, ते म्हणजे मुलीचे दिवंगत वडिलांचा आभासी अवतार. हे जोडपे ६ फेब्रुवारीला सिवालिंगापूरम गावामध्ये प्रत्यक्षात विवाहबंधनात अडकणार आहेत. अशा प्रकारच्या मेटाव्हर्स लग्नाचा विचार दिनेशच्या मनात आला होतो ज्याला जनगानंदिनी हिने मंजूरी दर्शवली आणि आणि म्हणून मेटाव्हर्सवरील आभासी दुनियेत त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

नवलंच! डिजिटल अवतारात मेटाव्हर्सवर लग्न  करणार तामिळनाडूतील जोडपं
ओमिक्रॉनचा लैंगिक संबंधावर परिणाम होतोय का? अशी घ्या काळजी

कोरोना काळात सर्वांसाठी योग्य

जंगनंदिनी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, तर दिनेश आयआयटी मद्रासमध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम करतात. दिनेशचा असा विश्वास आहे की, ''तो नेहमीच ब्लॉकचेनबद्दल उत्सुक आहे आणि व्हर्च्युअल जगाच्या कल्पनेमागे ब्लॉकचेनचे तत्त्व कार्यरत आहे. हे जोडपे पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर भेटले होते, तेव्हा त्यांना वाटले,की त्यांच्या लग्नाची मेजवानी यापेक्षा चांगला दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही आणि कोविडच्या दिवसात ते प्रत्येकासाठी योग्य असेल.''

पाहुणे जोडप्याला भेटवस्तू देखील देऊ शकतात

यासाठी दिनेशने क्वाटिक्स टेकचे विघ्नेश सेल्वाराज यांची भेट घेतली जो टार्डिव्हर्सच्या डिझाइनवर काम करत आहेत. या ठिकाणी लोक भेटू शकतील आणि खेळू शकतील. दिनेश आणि जंगनंदिनी यांच्या लग्नाच्या मेजवानीत, पाहुणे त्यांच्या अवतारांसाठी पाश्चात्य किंवा भारतीय पोशाख निवडू शकतात आणि जोडप्यांना Gpay किंवा Crypto द्वारे भेटवस्तू देखील देऊ शकतात.

नवलंच! डिजिटल अवतारात मेटाव्हर्सवर लग्न  करणार तामिळनाडूतील जोडपं
कोरोनामुळे गर्भपात होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सर्वात पहिल्यांदा अमेरिकन जोडप्याने केले होते मेटाव्हर्सच्या दुनियेत लग्न

त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी एक अमेरिकन जोडपे मेटाव्हर्स दुनियेत लग्न करणारे पहिले जोडपे ठरले. मात्र, यादरम्यान त्यांचा प्रत्यक्षात विवाहही ठरविण्यात आला. ट्रेसी आणि डेव्ह गॅगनॉनच्या डिजिटल अवतारांसाठी, अमेरिकन कंपनी विरबेलाने आभासी वातावरण (Virtual Wordl)तयार करण्याचे काम केले. या लग्नात त्यांचे प्रत्यक्षात लग्न होत असतानाच पाहुणे डिजिटल अवतार घेऊन आभासी लग्नात (Virtual Marriage) सहभागी होत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com