Ayodha Ram Mandir: इतका हिंदू विरोध, द्वेष कशामुळे? निर्मला सीतारमण यांचा तमिळनाडू सरकारवर गंभीर आरोप

Ayodha Ram Mandir: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आरोप केलाय की, २२ जानेवारी रोजी राम लल्ला प्रतिष्ठापणा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास तमिळनाडू सरकारने बंदी घातली आहे.
Ayodha Ram Mandir:
Ayodha Ram Mandir:

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोप केलाय की, २२ जानेवारी रोजी राम लल्ला प्रतिष्ठापणा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास तमिळनाडू सरकारने बंदी घातली आहे. सीतारमण यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्यात की, तमिळनाडूमध्ये श्रीरामाचे जवळपास २०० मंदिरं आहेत. या मंदिरामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी आणण्यात आली आहे.(Tamil Nadu govt has banned watching live telecast of Ayodha Ram Mandir programmes Nirmala Sitharaman tweets)

मंदिरामध्ये रामाच्या नावाने पूजा, भजन, प्रसाद वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतर काही मंदिर राम उत्सव साजरा करु पाहत आहेत, पण त्याला पोलीस आडकाठी आणत आहेत. मंडप तोडण्याची त्यांना धमकी दिली जात आहे. अशा प्रकारच्या हिंदू विरोधी आणि द्वेषपूर्ण कृतीचा मी निषेध करते असं निर्मला सीतारमण म्हणाले आहेत.

Ayodha Ram Mandir:
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर उत्सवाची जगाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल - मंत्री चंद्रकांत पाटील

लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्यामागे कायदा व सुव्यवस्थेचे कारण तमिळनाडू सरकार देत आहे. पण, हे खोटे आणि चुकीचे गृहितक आहे. अयोध्येचा निकाल आला तेव्हा देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली तेव्हा देखील देशाच्या कोणत्याही भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. जनता स्वयंस्फुर्तपणे श्रीरामच्या उत्सवात भाग घेऊ पाहात आहे, पण तमिळनाडू सरकार हिंदू विरोधी असल्याने त्यांना याचा त्रास होतोय, अशी टीका त्यांनी केलीये.

Ayodha Ram Mandir:
Ayodhya Ram Mandir : पुण्य पदरात पाडून घेण्याचा उद्या महत्त्वाचा दिवस, श्री राम विराजमान होतील तेव्हा नक्की करा या गोष्टी

डीएमकेची भूमिका काय?

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण आणि राममूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तमिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी याआधीच आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मशीद पाडून त्याठिकाणी मंदिर बांधण्यात आले आहे, याला आमचे समर्थन नाही, असं ते म्हणाले होते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com