
तामिळनाडु येथील एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ईडीने ताब्यात घेताच मंत्र्याला रडू कोसळले. त्यांना आयसीयुमध्ये दाखल केलं असल्याची माहिती वकिलांनी दिलीय. (Tamil Nadu Minister Senthil Balaji Breaks Down In ED Custody Arrested In Money Laundering Case )
ईडीने मंगळवारी मनी लाँडरिंग प्रकरणी तामिळनाडुचे वीज मंत्री वी सेंथिल बालाजी यांच्यासह निकटवर्तीयांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात छापे टाकले. चेन्नईत सेंथील यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईतील एका सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेव्हा मंत्री सेंथिल बालाजी यांना रडू कोसळलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Latest Marathi News)
नोकरीसाठी पैसे घेतल्याचा घोटाळा प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आणि ईडीला चौकशीची परवानगी दिली होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ईडीने कायद्यानुसार मंत्र्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. गेल्या महिन्यात आयकर विभागाने सेंथिल बालाजी यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकले होते.(Latest Marathi News)
सेंथिल बालाजीच्या प्रकृतीबाबत पी सेकर बाबू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उर्जामंत्र्यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. ते बेशुद्ध आहेत. कोणताच प्रतिसाद देत नाहीयेत. त्याच्या कानाजवळ सूज आहे. त्याच्या ईसीजीमध्येही बरेच चढ-उतार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तामिळानाडुचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यन आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टालीन यांनी चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात जाऊन सेंथिल बालाजी यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना स्टालिन यांनी सांगितलं की, सेंथिल बालाजी यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही या प्रकरणी कायद्याची मदत घेऊ. भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारच्या धमकीच्या राजकारणाने आम्ही घाबरणार नाही. असही स्टालिन यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)
डीएमके नेते सेंथील बालाजी यांचे वकील एनआर एलंगो यांनी सांगितलं की, सेथिल बालाजी यांना आयसीयुत हलवण्यात आलं आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. एखादी व्यक्ती सांगत असेल की त्याला मारहाण झालीय तर डॉक्टरांनी सर्व दुखापतींची माहिती घेऊन त्याची नोंद ठेवली पाहिजे. आम्हाला अहवाल आल्यानंतर दुखापतीची माहिती समजू शकेल. अद्याप ईडीने सेंथिल यांच्या अटकेची माहिती दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.