

Tamil Nadu CM C. Joseph Vijay during growing political tensions as MK Stalin claims that the DMK will soon form the government in Tamil Nadu
esakal
Vijay Thalapathy: तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय दिल्ली दौऱ्यावर असतानाच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) लवकरच राज्यात आपले सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी सोमवारी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. दुसरीकडे, विजय यांनी अलीकडेच आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या संभाव्य प्रयत्नांबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.