esakal | Breaking:तमीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसामच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

tamil nadu west bengal kerala assam election 2021 announcement

तमीळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यामध्ये आणि पाँडिचेरी या केंद्र शासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत.

Breaking:तमीळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसामच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली New Deilhi : तमीळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यांबरोबरच पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्यामुळं हे सर्वांसाठी एक आव्हान असल्याचं अरोरा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. केंद्रीय बोर्डाच्या अर्थात सीबीएसईच्या परीक्षांपूर्वी या निवडणुका होतील, असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 8 तर, आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तमीळनाडू, पुद्दूचेरी आणि केरळ या दक्षिणेतील निवडणुकांसाठी एका दिवशी 6 एप्रिलला मतदान आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी मात्र एकाच दिवशी होणार आहे. 2 मे रोजी या निवडणुकांचा एकत्रित निकाल लागणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असा असेल निवडणूक कार्यक्रम
पश्चिम बंगाल

 • मुदत संपणार - 30 मे
 • आठ टप्प्यांत निवडणूक
 • पहिल्या टप्प्यातील मतदान - 12 मार्च
 • दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 1 एप्रिल
 • तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 6 एप्रिल
 • चौथ्या टप्प्यातील मतदान - 10 एप्रिल
 • पाचव्या टप्प्यातील मतदान - 17 एप्रिल
 • सहाव्या टप्प्यातील मतदान - 22 एप्रिल
 • सातव्या टप्प्यातील मतदान - 26 एप्रिल
 • आठव्या टप्प्यातील मतदान - 29 एप्रिल

तमीळनाडू

 • मुदत संपणार - 24 मे
 • एकाच टप्प्यात निवडणूक
 • मतदान - 6 एप्रिल

केरळ

 • मुदत संपणार - 1 जून
 • एकाच टप्प्यात निवडणूक
 • मतदान - 6 एप्रिल

आसाम

 • मुदत संपणार - 31 मे
 • तीन टप्प्यांत निवडणूक
 • पहिल्या टप्प्यातील मतदान - 27 मार्च
 • दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 1 एप्रिल
 • तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 6 एप्रिल

पुद्दूचेरी

 • सध्या राष्ट्रपती राजवट लागू
 • एकाच टप्प्यात निवडणूक
 • मतदान - 6 एप्रिल

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या घोषणा

 • निवडणूक कर्मचारी कोरोना योद्धे
 • सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत काळजी घेतली जाणार
 • एकूण 18.68 मतदार 824 जागांसाठी मतदान करणार
 • एकूण 2.6 लाख मतदान केंद्रांवर होणार मतदान प्रक्रिया

पश्चिम बंगाल विधानसभा

 • एकूण जागा - 292
 • तृणमूल काँग्रेस - 209
 • काँग्रेस - 23
 • माकप - 19
 • भाजप - 27
 • इतर - 6
 • रिक्त जागा - 10

तमीळनाडू विधानसभा

 • एकूण जागा - 234
 • अण्णा द्रमुक - 124
 • द्रमूक - 94
 • काँग्रेस - 7
 • इतर - 2
 • रिक्त जागा - 4

केरळ विधानसभा

 • एकूण जागा - 140
 • माकप - 58
 • भाकप - 19
 • काँग्रेस - 21
 • भाजप - 1
 • इतर - 37
 • रिक्त जागा - 4

आसाम विधानसभा

 • एकूण जागा - 124
 • भाजप - 60
 • काँग्रेस - 19
 • इतर - 39
 • रिक्त जागा - 8

पुद्दूचेरी विधानसभा

 • एकूण जागा - 30
 • भाजप - 0
 • काँग्रेस - 15
 • द्रमुक - 2
 • अण्णा द्रमुक - 4
 • एन आर काँग्रेस - 8
 • इतर - 1
loading image