esakal | तरुण पाण्यात बुडत असताना, महिलांनी जे केलं ते ऐकून तुम्हीही कराल त्यांना सलाम
sakal

बोलून बातमी शोधा

tamilnadu-three-women-rescu.jpg

सोशल मीडियावर सध्या तीन महिलांचे कौतुक होत आहे.

तरुण पाण्यात बुडत असताना, महिलांनी जे केलं ते ऐकून तुम्हीही कराल त्यांना सलाम

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

चेन्नई- सोशल मीडियावर सध्या तीन महिलांचे कौतुक होत आहे. तामिळनाडूच्या एका गावात राहणाऱ्या सेंथमीज सेल्वी (38), मुथमल (34) आणि अनंतवल्ली (34) या तीन शूर महिलांनी 4 बुडणाऱ्या युवकांना वाचवण्यासाठी जे केलंय ते ऐकून तुम्हालाही त्यांना सलाम करावासा वाटेल. चार तरुण बुडत असल्याचं पाहून या तीन महिलांनी त्यांना वाचवण्यासाठी आपल्या साड्या काढून पाण्यात फेकल्या. विशेष म्हणजे त्यांना दोन तरुणांना वाचवण्यात यश आलं आहे. न्यू इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ब्राझीलची अमेरिकेच्या दिशेने वाटचाल; कोविड-19 मृतांचा आकडा धडकी भरवणारा

क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते तरुण

6 ऑगस्ट रोजी सिरुवंच्चर गावातील 12 तरुण मुले कोट्टारई गावात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. खेळल्यानंतर सर्व तरुण कोट्टारई धरणामध्ये पोहण्यासाठी गेले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणाचे पाणी 15 ते 20 फूट वाढले होते. 108 रुपये खर्च करुन गावाजवळ मेरुदाईयारु नदीवर कोट्टारई धरण बांधण्यात आले आहे. 

लष्करप्रमुख वापरतात पर्सनल एअर सॅनिटायझर; एक मीटर हवेतील सूक्ष्मजीवांपासून देतो...

सतर्क करुनही मुलं गेली पोहायला

जेव्हा मुले येथे पोहोचली तेव्हा आम्ही घराकडे निघालो होतो. मुलांनी धरणाच्या चारी बाजूने पाहिले आणि आम्हाला पोहोण्यासाठी विचारलं. पाणी खोल असल्याने आम्ही त्यांना पोहू नका असा इशारा दिला होता. मात्र, चार तरुण पाण्यामध्ये पोहोयला उतरलेच. त्यानंतर तरुण बुडत असल्याचं कळताच आम्ही कोणताही विचार न करता आमच्या साड्या काढल्या आणि पाण्यामध्ये फेकून दिल्या. त्यातील दोन तरुण साड्यांना धरुन किनाऱ्यावर येऊ शकले. मात्र, दोन तरुण पाण्यामध्ये बुडाले. आम्ही पाण्यामध्येच होतो पण आम्ही त्या दोन मुलांना वाचवू शकलो नाही, असं सेंशमीज यांनी सांगितलं आहे. 

ज्या तरुणांना महिलांनी वाचवलं त्यांची नावं कार्तिक आणि सेंथिलवेलन अशी आहेत.  मरणाऱ्यांची नावं पविथ्रन (वय 17) आणि एक ट्रेनी डॉक्टर रंजीथ (वय 25) आहे. तरुण बुडाल्यानंतर पेराम्बलूर अग्निशमन दल दुर्घटना स्थळी पोहोचले. बुडालेल्या तरुणांचे मृतहेद सापडले असून शव विच्छेदनासाठी पेराम्बूलर जिल्ह्याचील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मुलांना वाचवण्यासाठी या तीन महिलांनी जे केलं त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

(edited by-kartik pujari)