

Tapkeshwar Temple mystery
esakal
देवभूमी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधील घंटाघरपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले 'टपकेश्वर महादेव मंदिर' (Tapkeshwar Mahadev Temple) हे संपूर्ण देशातील शिवभक्तांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. एका नैसर्गिक गुहेमध्ये (Natural Cave) विराजमान असलेल्या या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की, येथे डोंगरातून पाण्याचे थेंब निरंतर शिवलिंगावर टपकत राहतात.