Target Killing : जम्मूत पुन्हा टार्गेट किलिंग, शोपियानमध्ये यूपीच्या दोन मजुरांची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

J & K

Target Killing : जम्मूत पुन्हा टार्गेट किलिंग, शोपियानमध्ये यूपीच्या दोन मजुरांची हत्या

Target Killing In Jammu & Kashmir : काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर आता पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातून टार्गेट किलिंगची घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला करून दोन गैर-काश्मीरी मजुरांची हत्या केली आहे. हत्या करण्यात आलेले दोघेही मजूर उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मनीष कुमार आणि रामसागर अशी या घटनेत हत्या झालेल्या मुजरांची नावे असून, ते उत्तर प्रदेशातील कन्नौजचे रहिवासी आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष तपास युनिट (SIU) सध्या संपूर्ण पुलवामामध्ये छापे टाकत आहे.

हल्ल्याच्या वेळी दोन्ही कामगार टिनच्या शेडमध्ये झोपले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी दहशवाद्यांनी 15 ऑक्टोबर रोजी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरन कृष्ण भट्ट यांची गोळ्या घालून हत्या केली होती. भट यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्यानंतर आज युपीच्या मजुरांची हत्या करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.